आणखी विलंब न करता व्यवसायिकांनी जीएसटीआर-9 साठी तयारी सुरू केली पाहिजे

मे संपत आला असून जून सुरू होत आहे! त्यामुळे तुमच्या सारख्या जीएसटी कर धारकांना हे माहीत असणे गरजेचे आहे:

✔जीएसटीआर-9 फाईल करण्यासाठी आर्थिक वर्ष 2017-18 ची अंतिम मुदत 30 जून 2019 आहे.

✔जर तुम्ही कम्पोझिशन स्किमचे करधारक असाल किंवा इकॉमर्स ऑपरेटर असाल तर तुम्हाला वार्षिक रिटर्न्स दुसरा फॉर्म भरून(जीएसटीआर-9 नाही) फाईल करावे लागतील.

✔ जर तुमचे वार्षिक टर्नओव्हर ₹2 करोड हून अधिक असेल तर तुम्हाला जीएसटीआर-9 सोबत जीएसटीआर-9सी देखील फाईल करावा लागेल.

जीएसटीआर-9 फाईल करायला काय लागतं?

✔जीएसटीआर-9 फाईल करणे सोपे नाही आहे! तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे सर्व व्यवहार सुरुवाती पासून तपशीलपूर्वक तपासावे लागतील.

✔जीएसटीआर-9 मध्ये, काही टेबल्स ऑटो-पॉप्युलेटेड असतात तर काही मॅन्युअली आधी भरलेल्या जीएसटीआर-1 आणि जीएसटीआर-3बी चा वापर करून भरावे लागतात.

तुम्ही भरलेला कर, तुमच्या विक्रेत्यांनी फाईल केलेले रिटर्न्स, तुमच्या अकाउंट पुस्तकातील नोंदी आणि तुमच्या जीएसटीआर-9 सारखे असले पाहिजे. सर्व माहिती एकमेकांशी जुळली पाहिजे.

✔तुमच्या अकाउंट्स आणि जीएसटीआर-9 मध्ये काही तफावत असेल तर ते नाकारण्यात येईल.

✔जर जीएसटीआर-9 मध्ये काही चूका आढळल्या तर तुम्हाला करविभागा कडून नोटीस पाठवण्यात येईल.

✔जर तुम्ही कर ऑनलाइन भरला असेल पण तुमच्या जीएसटीआर-3बी मध्ये चूका असतील तर तुमच्या जीएसटीआर-9 चुकीची माहिती  ऑटो-पॉप्युलेट होईल.

✔जर जीएसटीआर-1 मध्ये बी2बी विक्री आणि बी2सी चा चुकीचा अहवाल दिला असेल तर तो आता बदलता येणार नाही.

✔आधी चुका माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाउंट्समधील हजारो अहवालांचा आढावा घ्यावा लागेल. जे जर तुमच्या व्यवसायाच्या तपशीलांची डिजिटल कॉपी राखली नसेल तर अवघड होऊ शकते.

✔जर तुम्ही व्यापार (इथे डाउनलोड करा) सारखे स्मार्ट बिझनेस अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरत असाल तर ते तुम्हाला तुमच्या चुका ओळखण्यास आणि त्या सुधारवण्यात मदत करेल ज्यामुळे तुमचा वेळ आणि कष्ट वाचू शकतील.

✔जीएसटीआर-9 वापरून तुम्ही अतिरिक्त आयटीसी साठी दावा करू शकत नाही.

✔तुम्हाला जीएसटीआर-9 फाईल करण्याआधी न चुकता बाकी उर्वरित कर सरकारला द्यावा लागेल.

कोणताही विलंब न करता जीएसटीआर-9 कची तयारी सुरू करा. मुदत संपायच्या आत जीएसटीआर-9 बाबत सर्व समस्या लवकर सोडवा.

जीएसटीआर-9 यशस्वीरित्या फाईल केल्यास तुम्हाला येणाऱ्या वर्षांमध्ये तुमचा व्यवसाय व्यवस्थित आणि तणावमुक्तपणे करता येईल!!

नवीनतम जीएसटी च्या बातम्यांनी फक्त www.vyaparapp.in वर अपडेटेड रहा.

सोर्स: इकोनॉमिक टाईम्स

हॅपी व्यापरिंग!!

You May Also Like

Leave a Reply