Home » GST News » आनंदाची बातमीः जीएसआरटी/GSTR-9 ची मुदत दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

आनंदाची बातमीः जीएसआरटी/GSTR-9 ची मुदत दिनांक 31 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

  • by
Vyapar, GSTR-9, business accounting

जर तुम्ही जीएसटी/GST नोंदणीकृत व्यावसायिक असाल आणि तुमच्या  व्यवसायाचे काम सांभाळून दिलेली 31 डिसेंबरच्या मुदतीची कालमर्यादा सांभाळणे तुम्हाला संघर्षमय वाटत असेल तर, तुम्ही ऐकू इच्छित असलेली ही एक आनंदाची बातमी आहे.

वार्षिक रिटर्न जीएसआरटी/GSTR-9 दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर, 2018 निश्चित केली गेली होती. मुदतीच्या काही दिवसांपूर्वीच सरकारने डिसेंबर 31, 2018 या अंतिम तारखेत बदल केला असून, ती तीन महिन्यांनी पुढे ढकलून 31 मार्च  2019* करण्यात आली आहे.

[* 8 डिसेंबर 2018 अनुसार नवीनतम अपडेट केलेली माहिती]

याव्यतिरिक्त, तुम्हाला  2017-18 या आर्थिक वर्षात जीएसआरटी/GSTR-1 मध्ये सुटलेले इनव्हॉइसेस / डेबिट नोट्स / क्रेडिट नोट्स अपलोड करण्याची आणि वित्तीय वर्ष 2017-18 मध्ये दावा न केलेल्या आयटीसी/ITC चा दावा करण्याची परवानगी देखील आहे. तसे झाल्यास वार्षिक रिटर्न्सचा मेळ घालणे  सुलभ होईल.

निश्चितच,  ही एक कष्ट मुक्त करणारी बातमी आहे, नाही का?

जीएसटीआर/GSTR-9 दाखल करण्यासाठी अंतिम तारीख वाढविण्याची संभाव्य कारण

फॉर्म जीएसटीआर/GSTR-9, फॉर्म जीएसटीआर/GSTR- 9ए/A आणि फॉर्म जीएसटीआर/GSTR-9सी/C साठी अंतिम तारीख 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्याचा सरकारचा  निर्णय बऱ्याच कारणांवर आधारित असू शकतो.

वार्षिक रिटर्न्ससाठी प्रदान केलेल्या उपयुक्तते/युटिलिटी मध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे कदाचित असे केले असण्याची शक्यता आहे.  दुसरे म्हणजे, करदात्यांना या तणावपूर्ण तारखांपासून थोडी मुक्ती देण्यासाठी सुद्धा हा निर्णय घेतला असू शकतो. हा निर्णय कोणत्याही कारणास्तव घेतला असो यात नशीबवान ठरतील करदाते!

तुम्ही जीएसटी/GST वार्षिक रिटर्न्स तयार करण्यास सुरुवात केली असेल, तर तुम्हाला  नक्कीच माहित असेल की जीएसटीआर/GSTR-9 भरणे म्हणजे चेष्टा नव्हे. आपल्या वार्षिक रिटर्नमध्ये तपशील भरण्यासाठी तुम्हाला तुमचा मासिक रिटर्नमधील माहिती रितसरपणे पडताळणे आवश्यक आहे. फॉर्ममध्ये मागील वर्षात केलेल्या सीईजीएसटी/CGST, एसजीएसटी/SGST, आयजीएसटी/IGST आणि इत्यादी यासारख्या विविध शीर्षकांच्या अंतर्गत असलेल्या तपशीलांचा समावेश आहे. अशा प्रकारे, हा फॉर्म वर्षभरात झालेल्या मासिक/तिमाही रिटर्नमध्ये भरलेल्या विविध व्यवहारांची माहिती एकत्रित करतो. तसेच, काही अतिरिक्त माहिती तयार करणे आवश्यक आहे जी खरोखरच एक वेळखाऊ प्रक्रिया असू शकते.

पण आता, तुमच्याकडे यासाठी आवश्यक एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वेळ !!

उशिरा फाइल केले तर दंडात्मक कारवाईला सामोरे जाणे पडू शकते.

जीएसटीआर/GSTR-9 रिटर्न भरण्यास विलंब झाल्यास किंवा न भरल्याचा कसूर केल्यास परिणाम स्वरूप दररोज  200 (प्रत्येकी एसजीएसटी/SGST 100 आणि सीजीएसटीसाठी/CGST 100) दंड आकारला जाऊ शकतो. करदात्याने संपूर्ण पैसे भरेपर्यंत दंड आकारणे सुरू राहील, पण ही रक्कम जास्तीत जास्त  रु. 5,000 च असू शकते.

निश्चितच तुम्ही अशा प्रकारे पैसे गमवू इच्छित नाही, बरोबर ना?

सर्वोत्कृष्ट बिझिनेस अकाउंटिंग ॲप – व्यापर चा उपयोग करुन तुम्ही सुलभतेने तुमचा जीएसटीआर /GSTR-9  भरण्याची तयारी सुरु करु शकता. आणि तेही विनामूल्य !!!.

इथे डाउनलोड करा >>

हॅपी व्यापरिंग !

Leave a Reply