Home » GST News » जीएसटी रिटर्न फाईल करण्याच्या नवीन प्रक्रिया निलंबित झाली

जीएसटी रिटर्न फाईल करण्याच्या नवीन प्रक्रिया निलंबित झाली

  • by

जीएसटी रिटर्न फाईल करणे नेहमीच कठीण होते.नाही का?

सुदैवाने, यावर उपाय म्हणून सरकारने पद्धत सुलभ करण्याची आणि नवीन जीएसटी रिटर्न फॉर्म बनवण्याचे वचन दिले होते. ते 1 एप्रिल, 2019 पर्यंत तुम्हाला मिळायला हवे होते पण अजून मिळाले नाहीत. त्यात उशीर झाला आहे.

आता, सॉफ्टवेअर सिस्टिम 100% तयार झाल्यावरचं नवीन तारीख ठरवण्यात येणार आहे.

नवीन प्रक्रिया काय असेल?

  • जर तुमची वार्षिक उलाढाल ही 5 कोटी रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला जीएसटीआर 1, जीएसटीआर 2 आणि जीएसटीआर 3 फाईल करायची गरज नाही आहे.तुम्हाला दर  3 महिन्यातून(तिमाही) एकदा सुगम आणि सहज या दोन्ही पैकी एक फॉर्म फाईल करावा लागेल.
  • सहज” हा बी2सी व्यावसाय म्हणजे व्यवसाय जे थेट ग्राहकांना पुरवठा करतात, त्यांच्यासाठी रिटर्न फॉर्म आहे
  • सुगम” हा बी2बी व्यवसाय म्हणजे व्यवसाय जे इतर व्यावसायिकांना आणि ग्राहकांना देखील पुरवठा करतात, त्यांच्यासाठी आहे.
  • तरीही तुम्हला जीएसटीआर-3B फाईल करावा लागणार आहे.
  • जर संपूर्ण तिमाहीत तुमची एकही खरेदी, विक्री ज्यासाठी कर भरावा लागेल, किंवा काही टॅक्स क्रेडिट नसेल तर मग त्या पूर्ण तिमाही साठी तुम्हाला ‘निल/शून्य’ रिटर्न फाईल करावे लागतील.
  • तुम्ही रिटर्न्स एका एसएमएस ने देखील फाईल करू शकता.ऐकून सोपं वाटतं ना!

याचे फायदे काय आहेत?

  • लघू उद्योगांसाठी GST रिटर्न फाईल करणे सहज आणि सोपं असेल.
  • कोणतीही तक्रार नसेल.
  • खरेदीदार आणि विक्रेत्याचे इन्व्हॉईस सहज जुळवून बघता येतील.

याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की कंमेंट करा.

हॅप्पी व्यापरिंग!!!

Leave a Reply